अन्यथा चक्काजाम भीमआर्मीचा इशारा.!
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद: स्टेट बँक ऑफ इंडिया चौक ते बोरगडी कडे जाणारा रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे,रस्ता एवढा खराब झाला आहे की,वाहने काढणे सुद्धा खूप कठीण गेले आहे.हा रस्ता चांगला करावा यासाठी नगर परिषद प्रशासन यांना या अगोदर सुद्धा पाठपुरावा करण्यात आला होता परतू नगर परिषद चे याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या शाळा,महाविद्यालय सुरू झाले आहे,लहान मुले हे सायकल द्वारे शाळे मध्ये ये जा करत असतात यावेळी त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून या रस्त्यातून ये जा करावी लागत आहे.
ही नगर परिषद प्रशासन यांना माहिती असून देखील प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत आहे.या रस्त्यावर खड्डे पडले आहे,त्यात पाणी साचल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे या रस्त्यावर कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास सर्वस्व नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून मजबूत असा रस्ता न बनवल्यास भीम आर्मी व समस्त नागरिकाच्या वतीने १५/०७/२०२५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चौक येथे चक्काजाम आंदोलन करेल.

याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.अशा आशयाचे निवेदन मा.मुख्याधिकारी साहेब नगर परिषद पुसद यांना भीम आर्मी व समस्त नागरिकाच्या वतीने देण्यात आले.निवेदन देते वेळेस भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,सामाजिक कार्यकर्ते मनोज नाईक सर,व समस्त नागरिक तसेच बहुसंख्य नागरिक होते.
हे निवेदन समस्त भीम आर्मी व समस्त नागरिकाच्या वतीने देण्यात आले.


