प्रतिनिधी :-सगीर शेख खर्डी
भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी काही उद्योजकांनी औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी केल्यास होत्या परंतु तिचा ठराविक कालावधीत तसा वापर न झाल्याने भिवंडी तालुक्यातील भोकरी येथील शेतकरी निसार शेख यांनी महसूल मंत्री यांच्याकडे आपली जमीन औद्योगिक वापर न झाल्याने मूळमालक म्हणून आपल्याकडे परत मिळावी म्हणून अर्ज केला होता
त्यावर महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना तपासून कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत भिवंडी तालुक्यातील मौजे भोकरी येथील आपली शेतजमीन निसार शेख यांनी औद्योगिक करणासाठी मानस कृषी इंडस्ट्रीयचे एक संचालक आणि कुळ मुखत्यार यांना विकत दिले होते परंतु संबंधित कंपनीने महाराष्ट्र कुळवहिवाट 63 चे उल्लंघन करून 18 वर्षपेक्षा जास्त काळ जमीन औद्योगिक कारणासाठी वापरली नाही आणि जिल्हाधिकारी यांची संबंधित परवानग्या घेतल्या नाही आणि जमिनीची परस्पर विक्री केली म्हणून जमीन मूळ मालकाला परत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी त्यांच्याकडे मागणी केली होती परंतु जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी न करता शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला असा आरोप करत सदर शेतकरी यांनी महसूल मंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले असता त्यांच्या तपासून कार्यवाही करावी असे निर्देश दिले असता कार्यासन अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणीचा स्वयंस्पष्ट अहवाल कागदपत्रांसह तात्काळ 15 दिवसात शासनाला सादर करावा असे निर्देश दिले आहेत
यामुळे ज्या उद्योजकांनी औद्योगिक वापरासाठी शेत जमिनी खरेदी केल्या आहेत आणि मुदतीत तसा वापर केला नाही आहे आणि परस्पर विक्री केल्या आहेत अश्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.

