या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन केले म्हणजे लोकांना पहिल्यांदा धम्माचा उपदेश दिला. असे मानले जाते की या दिवसाला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. कारण बुद्धांनी या दिवशी आपल्या शिष्यांना धम्माचे ज्ञान दिले.आषाढी पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व:
१) आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथे आपल्या पहिल्या पाच शिष्यांना ( पंचवर्गीय भिख्खू ) यांना धम्माचा प्रथम उद्देश दिला. म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन केले.
२) याच आषाढी पौर्णिमेला पावसाळ्याचे तीन महिने बौद्ध भिक्खू एकाच ठिकाणी वास्तव्य करतात. त्याला वर्षावास असे म्हणतात. आणि आषाढी पौर्णिमेला वर्षावासाची सुरुवात होते.
३) आषाढी पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांनी २९. व्या वर्षी याच दिवशी गृहत्याग केला. महामीनिष्क्रमण असे म्हणतात.अश्याच प्रकारे बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांपैकी अनेक घटना आषाढी पौर्णिमेला याच्या आसपास घडल्या आहेत.
☸️जयभिम 🙏🏻नमो बुद्धाय☸️_💙__


