बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव तालुक्यातील आपटी (रामपूर ) येथे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम कमीत कमी 1 वर्षपासून रखडले असून त्यांचं काम खूप कासव गतीने चालू आहे,पाण्याच्या टाकीचीप्रथम परवडेल असा काम रोड फोडून पाईप लाइन टाकल्याने गावात नागरिकांनाच्या घरासमोरील खड्डे पडल्यामुळे छोटा मोटा अपघात घडू शकते तर याला जबाबदार कोण? प्रशासन की ठेकेदार असणार आहे असा प्रश्न गावाकऱ्यामध्ये पडला आहे.

ठेकेदाराला गावाकऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या कामा बद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात आले आहे. तर गावात पाईप लाइच्या खड्ड्यामुळे गावाकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर गावातल्या पाईप लाइनचे खड्डे बरोबर करून द्यावे आणि टाकीचे काम लवकर पूर्ण करावे अशी गावाकऱ्यांची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

