अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीचा ऑटो रिक्षा चालकाने विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत मुलीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
दरम्यान, पीडित मुलगी अकोला मध्यवर्ती बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटकेसाठी तिने प्रतिकार केला. मात्र, रिक्षा चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला.
त्यानंतर रिक्षातून तिने पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले.


