राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांची आज दिनांक 1 तारखेला जयंती असल्याचे औचित्य साधून राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात स्व वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर या कृषी दिनाचे औचित्य साधून श्रीरामपूर येथील शेतकरी बाबाराव येरेकार राळेगाव येथील शेतकरी प्रभाकर जुनगरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापक वसंतराव पुरके सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी स्व वसंतरावजी नाईक यांनी शेतकरी, जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याची आठवण करून आजचा नेता आणि स्व वसंतरावजी नाईक यांची तुलना करत खरोखरच आज अशा नेत्याची देशाला गरज असल्याचे सुतोवाच केले.त्यावेळी या कार्यक्रमाला कांग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, यांच्या सह भरत पाल,श्रावणसिंग वडते, अशोक काचोळे, श्रीधर थुटुरकर, महादेव मेश्राम बाळासाहेब दरणे सदानंद भोरे अंकुश मुनेश्वर सुधीर जवादे वैकुंठ मांडेकर मंगेश पिंपरे शुभम चिडाम प्रफुल्ल तायवाडे गोविंद चहांदकर केशवराव पडोळे , विनोद माहुरे,राजु पुडके मधूकर राजूरकर स्वप्निल जयपूरकर मनोज पेंदोर अफसर अली धवल घुंगरूड , कुंदन कांबळे, शंकर दातारकर,राजू मोहुर्ले प्रशांत ठाकरे , शेतकरी बाबाराव येरेकार, प्रभाकर जुनगरे यांच्या सह व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर कुणाल शिवरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र तेलंगे यांनी केले तर प्रास्ताविक मिलिंद इंगोले यांनी केले तर आभार अंकुश मुनेश्वर यांनी मानले. या शेतकऱ्यांच्या सत्काराच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


