रायगड जिल्हा प्रतिनिधी कैलासराजे घरत
मठाची आषाढी वारीची परंपरा आजपर्यंत जपली आहे!समर्थ रामदास स्वामींनी पंढरपुरात स्थापन केले तीन मठ..!समर्थ रामदास स्वामींनी भारतभर मठस्थापना केली हे तर आपण जाणतोच. परंतु समर्थांचे पंढरपुरात आजही तीन मठ आहेत हे फार थोड्या लोकांना माहिती असते.
समर्थानी पंढरपुरात मठ स्थापना करण्याची आज्ञा ज्या शिष्याला दिली ते अनंतबुवा मेथवडेकर रामदासी!आजही त्यांच्या वंशजांनी हा मठ आणि त्या मठाची आषाढी वारीची परंपरा जपली आहे! आता या पार्श्वभूमीवर सोबत जोडलेले चित्र नीट निरखून पहा! प्रसंग असा झाला कि समर्थ कल्याणासोबत पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले!त्यांना अनंतबुवा मंदिरात घेऊन गेले. पण समोर विठ्ठल कुठे दिसतोय! समोर तर साक्षात प्रभुरामचंद्र उभे आहेत असेच समर्थाना दिसू लागले!त्यांना प्रश्न पडला की इथे राम असा का उभा राहिलाय? हातातले धनुष्य बाण कुठे गेले? वानरदळ कुठे गेले? सीतामाई कुठे गेल्या? हे सर्व प्रश्न “येथे का रे उभा श्रीरामा ” या आपल्या प्रसिद्ध अभंगातून समर्थानी विठ्ठलाला विचारले आणि अखेरीस त्यांना साक्षात त्या जगनियंत्या पांडुरंगाने सगुण दर्शन दिले!रामदासी जैसा भाव… तैसा झाला पंढरीराव ! या प्रसंगाचे चित्रण या सोबतच्या चित्रात आपल्याला दिसेल! आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांनाही ते दर्शन घडावे म्हणून चित्र जोडले.
हे दुर्मिळ चित्र जतन करून आम्हा विठू-समर्थभक्तांना पाठविल्याबद्दल श्री प्रमोद रामदासी (सध्या राहाणार मॅडिसन अमेरिका) यांचे खूप आभार ! सर्वांना हे दर्शन घडवा!!! जय जय रघुवीर समर्थ !!

