रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत
दिनांक 3/7/2025 रोजी शाळा तपासणी निमित्त मा.डॉ.मनिषा देवगुणे यांनी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा शाळेस भेट देऊन शाळेची शैक्षणिक व विद्यार्थी प्रगती बाबत आढावा घेतला .
प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी यांचेशी अभ्यास व मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा याबाबत हितगुज केले. सन 2024/25 या वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक यांचेशी चर्चा केली फाईलची पाहणी करून मुख्याध्यपक व शिक्षक यांचे विशेष कौतुक केले.रायगड जिल्हा परिषद आयोजित भोपाळ अभ्यास दौरा यात खारपाडा शाळेतून 3 विद्यार्थिनी 3 विद्यार्थी व सहशिक्षिका सौ.नंदिनी कदम यांची निवड केली
त्याबाबत तसेच शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम, वर्गवार विद्यार्थी पटसंख्या याबाबत माहितीचा आढावा घेतला व विद्यार्थी शिक्षक यांचे अभिनंदन केले .जवाहर नवोदय विद्यालय यात चालू वर्षी तालुक्यातून ग्रामीण मधून एकमेव खारपाडा शाळेतून 2 विद्यार्थ्यांची व शिष्यवृत्ती धारक तालुक्यातून 3 विद्यार्थी खारपाडा शाळेतून निवड झाल्याने मॅडम यांनी त्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन व कौतुक केले तसेच शाळेचे रायगड जिल्हा शिवभूमी आदर्शपुरस्कार प्राप्त शिक्षक व मुख्याध्यापक श्री .प्रविण पाटील शिक्षक वृंद सेवा जेष्ठ तंत्रस्नेही शिक्षक श्री.दिनकर पाटील, सौ.नंदिनी कदम, सौ.ज्योती पाटील, सौ.संगीता पाटील व श्रीमती सुरेखा रुपनर या सर्व शिक्षक वृंद यांचे विशेष कौतुक केले व पुन्हा एकवेळ शाळेस भेट देण्याचे वचन दिले. सदर भेटी दरम्यान मा.रविकिरण पाडवी तपासणी समन्वयक कोकण भवन, मा.श्री.प्रमोद पाटील प्र .गटशिक्षण अधिकारी प स पेण, मा.प्रविण पाटील प्रकल्प अधिकारी पेण, मा.मुकुंद पाटील केंद्रप्रमुख जिते यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांस मोलाचे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नंदिनी कदम तर मान्यवरांचे स्वागत ईशस्तवन व स्वागत गीत घेऊन शाळेतील कलापथक विद्यार्थी व त्यांना हार्मोनियम साथ मुख्याध्यापक श्री प्रविण पाटील यांनी केली तसेच आभार प्रदर्शन सौ.नंदिनी कदम यांनी केले.

