विविध विषयावर लक्ष केंद्रित करून पुसद शहराला कायदेशीर वळण लावणार.
सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद /नुकतेच दिग्रस येथे सेवा करून पुसद येथे पदभार स्वीकारलेले सेवानंद वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पत्रकार परिषद संपन्न
पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करताना सांगितले की पुसद शहरातील अतिक्रमण मुक्त, करून विविध मार्गावरची वाहन व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी विशेष भर देणार तसेच बाल गुन्हेगारीकरण मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण ज्या ज्या शहरात सेवा केली त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासिका निर्माण करून शेकडो अधिकारी देश सेवेसाठी निर्माण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहरातील मुख्य रस्ते, शाळा, महाविद्यालय, लगत असलेले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आपण प्राथमिकता देणार असून कौटुंबिक सौहार्द पूर्ण वातावरण निर्माण करणे, इत्यादी उद्दिष्टा बरोबरच शहरातील, सामाजिक सलोखा व शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले.
दैनिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी तथा इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेचे नियोजन गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी नितेश भालेराव यांनी केले.


