अकोला जिल्हा प्रतिनीधी: -गणेश वाडेकर
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे. आज दिनांक ०१.०७.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा अकोला यांनी नाकाबंदी चे निर्देश दिल्या वरुन पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर हददीतील बुब पेट्रोल पंप जवळ स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने बुब पेट्रोल पंप जवळ. मूर्तिजापूर या ठिकाणी आरोपी योगेश अनिल कनोजे वय 33 वर्ष, रा. समता नगर, हा अवैध रित्या दारूची वाहतूक करत आहे अशा बातमी वरुन दारू रेड केला असता देशी दारू 15 तसेच विदेशी दारू 2 बॉक्स किमती 69,920/- चारचाकी गाडी कि. 5,00,000/-एकूण कि. 5,69,920/- अशा प्रकारे आहे की वर नमूद घ. ता. वेळी गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाल्यावरून नाकाबंदी करून रेड केला असता आरोपीच्या ताब्यात वर नमूद देशी विदेशी दारू मिळून आली. वरून मूर्तिजापूर शहर पो. स्टे. ला दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

