मराठवाडा विभाग प्रमुख :- शुभम उत्तरवार
भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी लोकशाही पध्दतीने बिनविरोध निवडून आलेले माजीमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवडीचा जोरदार जल्लोष लोहा शहरात भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून कार्यकर्त्यांना पेढे भरवून करण्यात आला.
यावेळी भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मा. जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, मा.नगरसेवक युवराज वाघमारे, मा.नगरसेवक संदीप दमकोंडवार, मा. नगरसेवक नबीसाब शेख , मा.नगरसेवक अमोल व्यवहारे , भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्ष नागनाथ पाटील चुडावकर, संजय चव्हाण डी.एन.कांबळे, युवा नेते यशपाल निर्मले, लक्की फुलवरे, सुधाकर सातपुते, बाळासाहेब कतुरे, शाहरुख शेख, आशिष व्यवहारे ,विनय चंदावाड, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणात विकास होत आहे. विधानसभेच्या निवडणुकाप्रमाणे आगामी न.प.,जि.प. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल व जनता भाजपाच्या पाठिशी आहे असे भाजपचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.


