गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ,सिंचन विहीर बांधकामामध्ये गंभीर गैरप्रकार:-लखन जाधव
लखन शाम जाधव, रा. तिवसाळा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. आमच्या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिंचन विहीर बांधकामामध्ये गंभीर गैरप्रकार झाले आहेत.
विहिरींचे काम अपात्र शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर करून ते अन्य लोकांनी करून घेतले असून, पात्र लाभार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ मिळालेला नाही. मी यासंदर्भात पंचायत समिती, CEO ZP, आणि मंत्रालयात प्रत्यक्ष तक्रारी केल्या असूनसुद्धा अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. याबाबत मी पत्रासोबत सर्व पुरावे जोडले आहेत. कृपया या विषयाकडे समाजहितासाठी लक्ष घालावे व स्थानिक प्रशासन यावर कारवाईस प्रवृत्त होईल अशा पद्धतीने बातमी प्रकाशित करावी ही विनंती.



