राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष व पीटीआयचे (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले विनोद पत्रे यांची नुकतीच दूरदर्शनच्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे पत्रकारिता क्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात सर्वत्र आनंदाची लाट पसरली आहे.विनोद पत्रे हे गेल्या १९ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आजवर स्थानिक, जिल्हा तसेच राज्यस्तरावर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनाशी निगडित विषयांवर भेदक आणि प्रभावी पत्रकारिता केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्रकारिता प्रवासात अनेक वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करण्यात आले. त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याचे बळ मिळाले, ज्याचे श्रेय थेट पत्रे यांच्या दूरदृष्टीला व संघर्षशील नेतृत्वाला जाते.पत्रे यांनी यापूर्वी हिंदुस्तान समाचार या बहुभाषीय वृत्तसंस्थेमध्येही कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तमाध्यमांमध्ये काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. पीटीआयसारख्या देशपातळीवरील प्रतिष्ठित वृत्तसंस्थेमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांनी जिल्ह्यातील विविध घडामोडींचे सुस्पष्ट आणि विश्वासार्ह वार्तांकन केले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खा.संजय देशमुख, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड, वंचितचे नीरज वाघमारे, मनसेचे अनिल हमदापुरे, विरेंद्र चव्हाण (पब्लिक पोस्ट )प्रमोद मेटांगे महाराष्ट्र क्रांती न्यूज कैलास कोडापे (अजिंक्य भारत )जितेंद्र खोडे (युवक आधार ) रजत चांदेकर (नवजीवन) तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.


