विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
नुकतेच काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलतांना भाजपाचा आमदार बबन लोणीकर याने शेतकऱ्यांबद्दल व त्यांच्या परिवाराबद्दल अपमानास्पद, बेताल अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून समस्त शेतकरी वर्गाचा अपमान केलेला आहे. शेतकऱ्यांना आम्ही दिलेल्या सरकारी योजनेच्या भरोशावर तुमचे कुटुंब चालते, तुमची शेती चालते, तुमच्या कुटुंबाला, बायका-मुलींना लाडक्या बहिणीचे पैसे मिळते, मुलांना शिक्षण मिळते, अशा प्रकारच्या व्यक्तव्य करून अन्नदाता असलेल्या समस्त शेतकरी वर्गाचा अपमान आहे.
वास्तविक पाहता या सरकारची योजनांचा पैसा हा काही भाजपा पक्ष व आमदार बबनराव लोणीकर आपल्या खिशातून घरातून देत नसून तो सरकारी तिजोरीतून दिला जातो. शेतकरी अन्नदाता असून तो सुद्धा जीएसटी च्या माध्यमातून बराचसा फंड सरकारी तिजोरीत जमा करतो.
शेतकरी विरोधी भाजपाचा खरा चेहरा या घटनेने उघड झाला आहे. या आमदाराचा निषेध करण्यासाठी व याची आमदारकी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी दि. ३० जून २०२५ सोमवार रोजी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन दुपारी ४.०० वा. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ, सिव्हिल लाईन्स, वर्धा येथे मनोज भाऊ चांदुरकर जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय, प्रदेश, सर्व जिल्हा फ्रंटल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले आहे.

भाजपा आमदार बबन लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोडे मारून निषेध व्यक्त करून जाळण्यात आला. यावेळी प्रामुख्याने बाळाभाऊ जगताप, गणेशभाऊ खोपडे, सुनीलभाऊ तळवेकर, ज्ञानेश्वरजी शिंदे, सुरेशभाऊ ठाकरे, रवींद्रभाऊ भुजाडे, खुशालभाऊ बावणे, अक्षयभाऊ खडसे, बाळाभाऊ माऊस्कर, नरेंद्रभाऊ चांभारे, हरिदासजी टिकले, ज्ञानेश्वररावजी मडावी, राजूभाऊ कंगाले, श्रावणभाऊ, नरेंद्रजी मसराम, पंजाबराव सिडाम, महेंद्रजी शिंदे, राजेंद्रजी शर्मा, ईक्रामभाई हुसेन, सुनीलभाऊ कोल्हे, धनंजयभाऊ देशमुख, चंदूभाऊ लाखे, डॉ. अभ्युदयजी मेघे, राहुलभाऊ सुरकार, प्रफुलभाऊ कुचेवार, विजयभाऊ दुर्गे, महेशभाऊ मोरे, सुधीरभाऊ पांगुळ, नंदकुमारभाऊ कांबळे, डॉ मिलिंदजी ठोंबरे, सतीशजी आत्राम, हबीबभाई शेख, अरुणाताई धोटे, अर्चनाताई भोमले, सोनालीताई कोपुलवार, सपनाताई परीयाल, बबीताताई नेगी, अनिताताई मून, सोनूताई सुटे, सुवर्णाताई नगरे, नंदकुमारजी वानखेडे, सुरेशभाऊ भगत, प्रशांतभाऊ कांबळे, पवनभाऊ गोसेवाडे, चंद्रशेखरजी झोरे, श्रीकांत धोटे व इतर सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थिती होते.

