विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
आज 26 जून रोजी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे तारांबळ उडाली रोटा या गावात आज रात्री पहाटे सिंधुबाई अळसपुरे व बाबाराजे बाडे यांचे निधन झाले परंतु सकाळी सात वाजता पासून पाऊस सुरू झाल्यामुळे गावातील छोट्या पुलावर पाणी साचले होते तर नागठाणा रोड वरती असलेल्या पुलावर पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे स्मशान भूमीत पोहोचणे कठीण झाले होते बांधकाम असलेल्या ठिकाणी जाने येण्याकरिता कोणतेही नियोजन न केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागला एन पावसाच्या तोंडावर पुलाचे बांधकाम चालू केल्यामुळे शेतकऱ्यांना नदीच्या पात्रातून येणे जाणे कठीण झाले त्यामुळे शेती पडीत राहण्याची सुद्धा भीती शेतकऱ्यांना वाटत आहे
तसेच स्मशानभूमी नदीच्या त्या बाजूला असल्यामुळे प्रेत सुद्धा नेता येत नाही तर अनेक नागरिकांनी पुरातून उचलून प्रेत न्यावे लागले तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना रस्ता व पूल मोकळा करून देण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.


