आजूबाजूचे परिसरातील नागरिक त्रस्त प्रशासन सुस्त दिखावदार पक्ष मनमर्जी पणामध्ये मस्त?
विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
- 14 /7 // 25 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन
शासकीय प्रशासनाला राजकीय लोकांना विविध पक्षातील संघटनातील लोकांनी निवेदन आवेदन दिले मोर्चे काढले तरीसुद्धा नागरिकांचे हाल तसेच याकरिता अन्न त्याग आंदोलन करून आपल्या पुलगावच्या नागरिकांसाठी प्रशासनाने अटी शर्तीने काम न केल्यास मरणार नाहीतर शासनाकडून राजकीय पक्ष कडून काम करून घेणार खूप झाले आता खपून नाही घेणार
मुद्दा क्रमांक (1)
रेल्वे उडान ब्रिजचे काम कित्येक दिवशी पासून चालू आहे त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करून योग्य ती कारवाई करून ब्रिजचे काम किती दिवसात होणार याची लेखी स्वरूपात अहवाल देण्यात यावा!
मुद्दा क्रमांक ( 2 )
पुलगाव अमरावती छोटा पूल याकरिता प्रस्तावना झाली असून फुलाचे काम चालू झाले नाही सदर काम व कामाचे निविदा 14 //7 //25 आंदोलनाच्या आधी करण्यात यावे आंदोलन मध्ये आश्वासन पत्र दिल्यास मान्य केल्या जाणार नाही पुलाचा वर्क ऑर्डर लेखी स्वरूपात अहवालासहित सादर करण्यात यावा!
मुद्दा क्रमांक ( 3 )
समस्त पुलगावकराकडून रेल्वे फाटक उघडण्यासाठी मागणी केली आहे परंतु दिलेल्या कालावधी पर्यंत न उघडल्यास अन दे खी केल्यास 14/ 7 / 25 पासून चालू झालेल्या अन्नत्याग आंदोलन मध्ये जेव्हा पर्यंत रेल्वे गेट उघडणार नाही तेव्हापर्यंत अन्शन चालू राहणार याची दखल घ्यावी
मुद्दा क्रमांक (4 )
रेल्वे स्टेशन चौक ते नाचणगाव कुर्ला पर्यंत रस्त्याच्या दुभाकीकरण करण्यात आले यामध्ये इलेक्ट्रिक पोल तसेच बोरिंग हॅन्ड पंप रस्त्याच्या मध्ये आहे ते त्वरित काढण्यात यावे व रस्त्याचे काम तसेच रस्त्यामधील लाइटिंग व्यवस्था त्वरित करणे अन्यथा कंपनीला ब्लॅक लिस्ट करून सदर कामाचा अहवाल कामाची कालावधी किती दिवसात करणार लेकी स्वरूपात देण्यात यावे
मुद्दा क्रमांक (5 )
नाचणगाव येथील भिकन शहा वली दर्ग्याच्या सौंदर्य करण्याकरिता जिल्हा परिषद कार्यालयाकडून आश्वासन देण्यात आले होते लवकरात लवकर सौंदर्यीकरण करण्यात येणार परंतु ते आजपर्यंत करण्यात आले नाही याकरिता सौंदर्य करण्याचे प्रस्तावना वर्क ऑर्डर निविदा लेखी स्वरुपात देण्यात यावे
मुद्दा क्रमांक ( 6 )
लिंबूनि नगर येथील ओपन स्पेस ला गार्डन बनवून त्याचे सौंदर्यकरण करण्यात यावे त्या विशेषतः लहान लेकरांचे झुले व व्यायाम करिता साधन सामग्री उपलब्ध करून सदर प्रस्तावना अहवाल लेखी स्वरूपात देण्यात यावे
मुद्दा क्रमांक ( 7 ) पुलगाव येथील सरकारी दवाखान्यामध्ये डॉ. नर्स स्टाफ त्वरित देण्यात यावे साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात यावी वारंवार सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या डॉक्टरांवर कंप्लेंट करण्यात आल्या त्या डॉक्टरांना पुलगाव सरकारी दवाखान्यातून बाह्य करण्यात यावे त्या जागी समजदार शिस्तबद्ध डॉक्टर यांची नियुक्ती त्वरित करण्यात यावी
यामधील सदर मागण्यावर शासन प्रशासनाने सत्तेमधील आमदार सत्य बाहेरील खासदार विचार विनिमय करून मागण्या अटी स्वरूपात पूर्ण करावे समस्त पुलगाव नाचणगाव आजूबाजूच्या परिसरातील जनतेची मागणी आहे त्यामधील खोटे आश्वासन न देता रीतसर मागण्या पूर्ण करण्यात यावे ही विनंती अन्यथा संविधानिक मार्गाने 14/7/25 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार अंकुश कोचे समस्त नागरिक गण अंकुश कोचे
भीम आर्मी विदर्भ प्रमुख
जी भाऊ सेवा फाउंडेशन


