गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
येथील प्रभाग क्रमांक 14 येथे गेल्या अनेक वर्षापासून हागणदारी आहे सदर हागणदारीमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे आरोग्यासाठी धोका निर्माण झाला असल्याने येथील हागणदारी तात्काळ बंद करून त्या ठिकाणी सुशोभीकरण न केल्यास नगरपंचायत समोर टमरेल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिनांक 23 जून रोजी नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला,
प्रभाग क्रमांक 14 येथे शहराच्या मध्यभागी लोकवस्तीच्या ठिकाणी हागणदारी आहे गावातील महिला प्रात विधीसाठी उघड्यावरच शौचास येत असतात यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, येथील स्थानिक नागरिकांनी सदर हागणदारी बंद करण्याबाबत अनेक वेळा लेखी आणि मौखिक तक्रारी दिल्या परंतु संबंधित प्रशासनाला हागणदारी बंद करण्याबाबत अपयश आले, एकीकडे शासन हागणदारी मुक्त गाव योजना राबवत असताना ढाणकी नगरपंचायत कडून मात्र हागणदारी मुक्त गाव मोहिमेला हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

प्रभाग क्रमांक 14 स्थित हागणदारी 15 दिवसाच्या आत बंद करून त्या ठिकाणी सुशोभीकरण न केल्यास ढाणकी नगरपंचायत समोर येथील नागरिकांना सोबत घेऊन हातात टमरेल घेत समवेल आंदोलन करण्यात येईल असा इशारा, मुख्याधिकारी ढाणकी, ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी यांना देण्यात आला यावेळी सुमित बुरसे, गणेश काटोले, आकाश मुरकुलवाड,बालाजी अलकटवार माजी नगरसेविका मंदाकिनी नंदनवार, प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे,सरिता बुरसे, अनिता गुंडेवार, लक्ष्मीबाई याटेवाड,ललिता गुंडेवार, सुमित्राबाई ढेंगे, अनुसया काटोले, शुभांगी नंदनवार,अनुराधा
ताटीकुंडलवाड शोभा ढेंगे , नागेश लकडे, अभिजित कत्तलवाड, ओंकार ढेंगे गोलू मुनेश्वर शुभम गाडगे, आकाश कत्तलवाड:विलास चिट्टेवाड, शुभम ताटीकुंडलवाड, समाधान राऊत यासह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


