आर्णी तालुका प्रतिनिधी:- शिवम सोळंके
आर्णी–ग्रामीण रुग्णालय आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या जागतिक योग दिवस ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या आनंद उत्साहाने साजरा केला. इन्चार्ज कार्लेकर मॅडम यांनी कर्मचाऱ्या सोबत सुर्य नमस्कार केले.
यावेळी योगामधील विविध प्रकारांचा यावेळी सराव करण्यात आला व योगाबद्दल माहिती दिली.
आयोजन डॉ.विकास जगताप यांनी केले होते. यावेळी जागतिक योगा दिवसानिमीत्त या विषयावर मार्गदर्शन केले व सर्व खेळाडूंना जागतिक योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये दुध्दलवार सर, जयस्वाल सर, टोपे सर व इतर काही कर्मचारी उपस्थित होते.

