तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात धार्मिक शिक्षनाची महत्वाची भूमिका –
- पूर्व अभिनेते आरिफ खान यांचे प्रतिपादन
- फुलसावंगी येथे दारुल उलुम च्या बांधकामाची पायभरणी सपन्न
- हजारो च्या संख्येनी समाज बांधवानी लावली हजेरी
गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
प्रतिनिधी :-
आज समाजातील तरुण वर्ग हा इस्लामी शिकवणी पासून दूर लोटला जात असून मुख्य शिकवण विसरल्याने वेगवेगळ्या नशे च्या आहारी जातांना पाहवयास मिळत आहे.अशा धार्मिक मार्गभ्रष्ट तरुणांना धार्मिक शिक्षनाची मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका असून, इस्लामी शिकवणी ही माणसाला माणूस बनविते म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज झाली आहे.असे विचार येथील यशवंत नगर येथे दारुल उलुम उमर फारुख (र.) या इस्लामी धार्मिक शिक्षण संस्थेच्या इमारतीची ‘संगे बुनियाद’ म्हणजे बांधकामाची सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने पूर्व अभिनेते आरिफ खान यांचे व्यख्यांनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वरील विचार मुख्य वक्ते आरिफ खान यांनी व्यक्त केले.
फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बहुल गाव असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद, हिमायत नगर,उमरखेड, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.शिक्षणासाठीची मुलांची ही पायपीट थांबावी या उद्देशाने फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम या नावाने मुफ्ती उमर ईशाती, हाफिज शेख मुज्जफर, शेख फारुख यांच्या माध्यमातून मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. ‘मदरसा’ आणि ‘उलुम’ हें शब्द अरबी असून मदरसा हे शब्द शैक्षणिक संस्थे साठी वापराला जातो तर उलुम या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो.फुलसावंगी येथील नव्याने सुरु होत असलेल्या येथील यशवंत नगर मध्ये मदरश्या च्या इमारती च्या बांधकामाची सुरुवात बुधवारी करण्यात आली. या निमित्ताने बुधवारी धार्मिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने अभिनेते आरिफ खान होते. त्यांनी यावेळी त्यांची बॉलिवूड ची सोनेरी जगताला सोडण्याचा प्रसंग विषध करून धार्मिक शिकवणी अंगीकारून त्यावर कडेकोड आचरण करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित हजारो च्या जन समुदयाला केले.


