सातारा जिल्हा प्रतिनीधी: – निलेश कोकणे
वडूज आगार एस टी बस लोकार्पण सोहळा
वडूज आगारासाठी नवीन एस.टी.बस मिळण्यासाठी अनेक मान्यवरांनी पाठपुरावा केला होता. वडूज आगारासाठी १० एसटी बस मंजूर केल्याचे समाधान वाटते.नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक चांगली व सुलभ वाहतूक सेवा अनुभवायस मिळणार असून ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला नक्कीच बळ मिळेल.
माण व खटाव तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी नवीन बस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होईल.” सुसज्ज अशा नवीन वडूज बस स्थानकासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.या कार्यक्रमात माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रास्ताविक भाषणात संतोष बोराटे म्हणाले की,अनेक वर्षानंतर वडूज एसटी आगराला नवीन बस मिळाल्या आहेत.लांब पल्ला,मध्यम लाम्ब पल्ला मार्गावर नवीन बस धावणार असून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
यामुळे प्रवाशी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून आजचा दिवस हा वडूज आगरासाठी सुवर्णक्षणआहे.यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य,प्रा.बंडा गोडसे सर, मा.जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे (आबा), आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे,विधानसभा प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले , मा.तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, युवानेते विशाल बागल,खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी,वडूज नगरीच्या नगराध्यक्ष सौ.रेश्मा श्रीकांत बनसोडे,वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, यंत्र अभियंता विकास माने,दहिवडी आगारव्यवस्थापक श्री.कुलदीप डूबल, वाहतूक एसटी कामगार संघटना सातारा विभागीय सचिव श्री.अजित पिसाळ, वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे, मा.पंचायत समिती सदस्य डॉ.विवेक देशमुख ,भरतशेठ जाधव, शशिभाऊ पाटोळे, निवृत्त केंद्रप्रमुख मा.श्री.बचाराम साबळे सर, निलेश कर्पे,श्रीकांत (काका) बनसोडे, विक्रम रोमन, वडुजचे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, नगरसेवक जयवंत पाटील ,सचिन माळी, सुनील (बापू) गोडसे, संदीप (अण्णा) गोडसे, गणेशशेठ गोडसे, मा.उपनगराध्यक्ष मनोज कुंभार,श्रीकांत काळे,ओंकार चव्हाण सुधीर गोडसे,प्रदीप खुडे, बापू ननवरे, खटाव तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष सोमनाथ बुधे यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जनप्रतिनिधी, पत्रकार बांधव या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते.


