अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
उमेश दिनकर मस्के याच्या १५ जून रोजीच्या तक्रारीवरून डाबेराव यांची हत्या झाल्याचे दिसुन आल्याने पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार यांच्या माहीतीवरून रोहीत राजु सोळंके (रा. कौलखेड) यास ताब्यात घेतले.
मृत गंगाधरने रोहित सोळंके यास दारू पिण्याकरीता पैसे मागितले. त्याला नकार दिल्याने मृत गंगाधरने रोहित सोळंके सोबत वाद घालुन शिवीगाळ केली. त्याच रागातून रोहित सोळंके याने गंगाधर डाबेराव याला काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करून जिवानीशी ठार मारले, असे सांगितले.


