अहमदपूर तालुका प्रतिनीधी: – नागनाथ लांजे
अहमदपुर :- वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील साैर पंपाचे नुकसान झाले आहे ही घटना अहमदपुर तालुक्यातील लांजी येथे साेमवारी संध्याकाळी घडली परिणामी हंगाम पूर्व कपाशी लागवड सुरू असताना सौर पंपाचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.लांजी येथील शेतकरी पंढरी भीमराव केंद्रे यांच्या शेतात बोरवेल वरील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात आला आहे.
लांजी परिसरात साेमवारी संध्यकाळी रात्री 8 वाजेच्या सुमारे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पांढरी केंद्रे यांच्या शेतातील सौर पंपावरील पॅनल उडून गेले आहेत. यामुळे पंढरी केंद्रे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, दरम्यान हंगाम पूर्व कपाशी लागवड सुरू असताना सौर पंपाचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

