प्रतिनिधि :-सुनिल वर्मा
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कब्रस्तानचे लोकसभागातून साफसफाई व तार कंपाऊंडचे कामास सोमवार पासुन सुरुवात करण्यात आले आहे.

लोणार तालुक्यातील किनगाव जटुटु येथील मुस्लिम समाज बांधवांचे कब्रस्तान मध्ये वॉल कंपाऊंड नसल्याने येथे घाण होत होती .तसेच पावसाळ्यामध्ये लहान लहान काटेरी झुडपे उगत असल्याने दफनविधी करण्याकरिता अगोदर नागरिकांना कब्रस्तान मध्ये जाऊन झाडे झुडपे काढून साफसफाई करावी लागत होते. त्यानंतरच दफनविधी करावा लागत होते. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होते. ही बाब सर्व मुस्लिम बांधवांनी लक्षात घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन आपण एक यशस्वी पाऊल उचलून लोकसहभागातून कब्रस्तानचे साफसफाई व तार कंपाउंड करण्याचे ठरवीले त्यानुसार दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष साफसफाई व तार कंपाउंड चे कामास जेसीबीच्या साह्याने व स्वथाच्या मेहनतीने सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी निलेश महाजन, ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते, राजेश नागरे, कदिर शाह ऊर्फ बाबा भाई, सलीम शहा , युनुस शहा,जुम्मा शहा ,सत्तार शहा, आयुब शहा, भिकन शहा, बशीर शाह, ईलीयाज शाह, मुना शाह , बाबा किराना, जफर शहा, आयुब शहा ,आसेप शाह, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यात कब्रस्तान करिता काही कमी पडू देणार नसल्याचे मुस्लीम समाज बांधवांनी अश्वासन दिले आहे.

