विदर्भ विभाग प्रमुख युसूफ पठाण
माणूस नावाचा प्राणी सर्व प्राणी पक्षी वृक्ष किटक आदी नंतर अखेरीस जन्माला आला तसे त्याच्या जिवणात समस्या, अडचणी, अडथळे, अतिवृष्टी, जंगलात आगी लागणे जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणे,तर शेतीचा शोध लागून माणव वस्ती निर्माण झाली यासोबतच रोगराई,वृध्दाअवस्था,गरीबी मृत्यू असे अनेक प्रसंग आले त्याचे उत्तर नशीब प्रारब्द संचित मागच्या जन्माचे पाप पुण्य असे त्याला सांगण्यात आले मात्र गौतम बुद्ध हा पहिला व्यक्ती आहे ज्याने वरील सर्व घटनेमागे कारण असते ते मानवी बुद्धीला समजू शकते ते तो बदलू शकतो असा साधा कार्यकारणभाव सांगितला असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले
नागरीक बॅक परिसरातील लुम्बिनी बुद्ध विहारात मुला मुलींचे बौद्धिक सक्षता पायाभरणी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना निमंत्रित करण्यात आले यावेळी मंचावर भिमोदय उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद खेडकर, उपाध्यक्ष डॉ प्रदिप थुल, प्रभाकर भगत, शिबिर संयोजक प्रकाश कांबळे सचिव राजू वरके, सहसचिव महेन्द्र डहाके, कोषाध्यक्ष प्रकाश मून प्रसिद्धी प्रमुख सचिन वागदे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी गजेंद्र सुरकार पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले गौतम बुद्ध हे भारतातील त्यावेळचे सार्वभौम व सुर्यवंशी राजे होते त्या राजशाहीतील राजकुमार होते सर्व प्रकारचे ऐश्वर्य,धन संपत्ती,नोकर चाकर आणि आनंदाने जिवण जगत असताना आपल्या राजशाहीतील सर्व साधारण जनता दु:खी,अनेक दुर्धर आजाराने ग्रासलेली, गरीब का आहे जो धान्य पिकवितो तोच का उपाशी राहतो जो दुस-यासाठी कपडे शिवतो तोच का उघडा नागडा असे अनेक प्रश्न गौतम बुद्धाला पडले याचा शोध घेण्यासाठी यामागील कारण शोधण्यासाठी ते राजपाट सोडून जंगलात निघाले ज्याने जे जे सुचविले ते त्यांनी शरीराला त्रास देवून करून पाहले पण उत्तर मिळाले नाही कालांतराने अखेरीस त्यांना एक तत्वज्ञान समजले जेवढे दु:ख , समस्या अडचणी, गरीबी आरोग्याचे प्रश्न आहे त्यामागे कारण आहे ते आपण बदलू शकतो ते कार्यकारण भावाने बध्द आहे ते आपल्या बुद्धीला समजू शकते आज समजले नाही तरी कालांतराने ते समजेल हा महामंत्र त्यांनी जगाला दिला आणी विज्ञानाला शोध घेण्यासाठी याचा उपयोग झाला आज मात्र उलट चित्र आहे भ्रामक ज्योतिष्याशास्त्र, वास्तूशास्त्र,कुडलनी जागृती,आत्मा,कुडली, नारायण नागबळी, कालसर्प योग, सत्यनारायण पूजा, अनेक प्रकारचे कर्मकांड निरर्थक यज्ञयाग उपवास करणी जादुटोणा, भानामती,भुत लावडीन चकवा पाप पुण्य स्वर्ग नरक अशा गैरसमजुती मागे धावून जात आपले श्रमाचे पैसे श्रम न करणा-या पुजारी पुरोहित मुल्ला मौलवी पाद्री,भंते यांना अर्पण करून त्याबदल्यात काळे पिवळे पांढरे हिरवे लाल धागे बांधून कार्यकारणभावापासून फारकत घेतात हि विज्ञानाची सरणी आहे करणी नाही त्यासाठी गौतम बुद्धाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाने अंगिकारणे फारच गरजेचे आहे त्यामुळे ते ५१ कलमा अन्तर्गत प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे
पुढच्या सत्रात हसत खेळत विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना अनेक चमत्काराचे सादरीकरण करून त्या मागिल हातचलाखी वस्तूत घडामोड रसायनांचा वापर करून कसे चमत्कार करतात हे समजावून सांगितले तर चमत्काराला गौतम बुद्धाने सपसेश नाकारले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चमकदार वस्तू रस्त्यावरून उचलून ती सोन की पितळ हे जसे तपासून पाहता तसे जिवणातील प्रत्येक प्रसंगा मागिल कारण समजून घेतले पाहिजे तरच आपण सर्व चमत्काराला बळी पडणार नाही चमत्कार कधीही कोणीही कोठेही करून शकत नाही हे अनेक उदाहरणे व चमत्काराचे सादरीकरण करून समजावून सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर भगत तर सुत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले आभारप्रदर्शन प्रमोद खेडकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद पाटील,विनय नागदिवे,सरला लामसोगे क्षमा मुदावने,सुनिता सहारे,प्रा नारोसेन बनसोड सतिश डोंगरे, रमेश ढोके धवणे गुरूजी,विजय थुल गौतम कांबळे, पांडूरंग थुल,प्रभाकर लोहकरे यांनी परिश्रम घेतले

