लातुर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 4 ते 7 डिसेंबर दरम्यान लातूर ते मुंबई स्पेशल ट्रेन चालू करण्याची खा.डॉ शिवाजी काळगे यांनी केली मागणी.
लातूर- महापरिनिर्वाण निमित्त भीमसैनिकाची चैतन्यभूमी वर जाण्यासाठी मोठी गर्दी असते. यासाठी दिनांक 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान लातूर ते मुंबई स्पेशल ट्रेन चालू करण्यात यावी. अशी मागणी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान डिव्हिजन मॅनेजर सेंट्रल रेल्वे सोलापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले असल्याचे खा. डॉक्टर शिवाजी काळगे यांनी म्हंटले आहे.


