अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
अकोला-मूर्तिजापूर रोडवरील सांगळूद गावाजवळ गौरक्षकांनी कत्तलीसाठी अवैधरित्या नेल्या जात असलेल्या दोन गौवंशांची तस्करी रोखली. आज १० मार्च रोजी सापळा रचून मालवाहू गाडी अडवली व बोरगाव मंजू पोलिसांच्या मदतीने गोवंशांची सुटका करण्यात आली. त्यांना म्हैसपूर येथील आदर्श गोशाळेत दाखल करण्यात आले. पोलिसांनी तस्करांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील गौरक्षकांची गोवंश तस्करांवर करडी नजर. गोरक्षकांनी लागोपाठ चार-पाच गोवंश तस्करांना पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

