🔵पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख🔵
धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा
संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित,राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संविधान गौरव महोत्सव अंतर्गत आज दिनांक 22 /2/25 ला निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.राजेश कुमार सुर तसेच निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. मलगाम यांनी पाहिले. महाविद्यालयाने निबंध स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचे ठरविले कार्यक्रमाचे आयोजन संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. दया मेश्राम यांनी केले.

