अकोला विभाग प्रतिनिधी:- इम्रान् खान सरफराज खान
अकोला – आंबेडकरी चळवळीतील व सहवासातील प्रणेते आदरणीय बापुसाहेब गायकवाड यांचे नातू तसेच भिम चौक स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आयु. सिध्दार्थभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव युवा उद्योजक आयु उज्वल गायकवाड़ यांनी सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर सभागृह येथे आपल्या सहका-यांसोबत जावून उपेक्षितांच्या हकासाठी अन्याय, अत्याचार, ग्रस्तासाठी धावून जाणारे, भ्रष्टाचाराचे विरोधात जबरदस्त प्रहार करुन तळागाळातील सर्व स्तरातील शोषित व पिडीताचे विविध मुलभूत हक्क गंभीर समस्या लोकशाही दिनाचे माध्यमातून शासन दरबारी मांडून त्या सर्वांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देणारे विदर्भातील एकमेव कर्दनकाळ म्हणून सर्वत्र ख्याली प्राण असलेले फुले आंबेडकर साळवे साठे सार्वजनिक विकास मंचचे अनंतराव साळवे यांची वाटचाल व फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेवून पुढील उन्नती व प्राप्तीच्या प्रवासाकरिता सभागृहामध्ये पुष्पहार घालून सत्कार करून त्यांना ५ हजार रुपये देणगी स्वरुपात प्रदान केली. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्यात. या कार्यक्रमा दरम्यान भिमचौक स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थभाऊ गायकवाड यांनी सुध्दा अनंत साळवेयांनी अथक परिश्रम घेवून व निस्वार्थी भावनेतून जिद्द, चिकाटीतून बहुमोल कार्य केले असल्याचे म्हटले तसेच पुढे बोलतांना सिद्धार्थभाऊ गायकवाड यांनी अशोक नगर परिसरातील दानशूर व्यक्तींनी अशाच प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला मदत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला युवा उद्योजक आयु. उज्वल गायकवाड, साहिल गायकवाड यांचेसह भिमचौक स्मारक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आयु. सिध्दार्थभाऊ गायकवाड, नामदेवराम ठोसर, अशोक साळवे, गायकवाड, राहुल क्षिरसागर, बाळू गावंडे, शुभम सावंत, आशिष ओव्हाळ, सोनु बोराडे, अमित सावंत, सदाशिवराव सोनोने, अशोक गोळे यांचेसह सभागृहाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी संस्थापक अध्यक्ष अनंत साळवे यांनी आदरणीय बापुसाहेब गायकवाड यांच्या परिवारातील जागृत युवापिढीतील युवा उद्योजकाने भरीच कार्य केल्याबद्दल आ. बापूसाहेब गायकवाड यांच्या संपूर्ण गायकवाड परिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले.

