यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथे 395 वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,व शाळेतील विद्यार्थी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला
नंतर शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित परीक्षा घेऊन बक्षिस वितरण व नंतर येवती शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक चालखुरे सर व सहायक शिक्षका माकोडे मॅडम, बोंदाडे मॅडम शिक्षण सेवक चट्टे सर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विचार मांडले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष साईनाथ भोयर तर प्रमुख पाहुणे म्हणून वृषभ दरोडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामाजी महाजन , कृष्णा मडा
वी,अंगणवाडी सेविका प्रांजली येंगडे, अल्काताई पारधी , नंदाताई पोहधरे, सुमनबाई तुमसरे हे सर्व हजर होते.

