माहिती संकलन विभाग प्रमुख:- पियुष गोंगले
*गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली जि गडचिरोली येथे विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने ध्वनीप्रदूषणाचे परिणाम कारणे व उपाय या संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार आयोजन करण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एन बुटे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ सुधीर भगत व प्रा डॉ विनोद पत्तिवार सर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्य बुटे सरांनी ध्वनिप्रदूषण संदर्भात मार्गदर्शन केले,मानव आणि इतर प्राण्यांवर ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामा संदर्भात माहिती दिली व प्रत्येक व्यक्तीने ध्वनी प्रदूषण कसे कमी होईल यासंदर्भात प्रयत्न करावे असे आव्हान केले, सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा शरदकुमार पाटील, प्रा डॉ विश्वनाथ दरेकार,प्रा निलेश दुर्गे, प्रा डॉ राजीव डांगे, आणि इतर कर्मचारी उपस्थित होते

