दि. 17 फेब्रुवारी 2025
हातकणंगले, सचिन लोंढे
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर नाईट हायस्कूल, इचलकरंजी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व SSC शुभ चिंतन व निरोप समारंभ 2024-25 मोठ्या उत्साहात पार पडला. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस भावनिक आणि आनंदाचा ठरला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ. साधना मधाळे (कांबळे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, श्री. सुनील सोनटक्के, श्री. अमित भंडारे यांची उपस्थिती होती. तसेच उपस्थित सर्व गुरुदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गवळी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एस. एम. पाटील, श्री. यू. आर. चौगुले, श्री. जी. आर. शिंदे, श्री. ए. बी. पाटील, श्री. एस. चव्हाण, श्री. बी. एम. मजगे यांच्यासह विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ. साधना मधाळे (कांबळे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, श्री. सुनील सोनटक्के, श्री. अमित भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षक व शाळेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, तर काहींनी आपले भविष्यातील स्वप्न उलगडले.
शाळेच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाने आणि भावनिक वातावरणात निरोप घेतला. या समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

