वर्धा प्रतिनिधी:-
वर्धा जिल्ह्यातील जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फे 47 वर्धा विधानसभा निवडणूक 2024 चे वर्धा विधानसभेचे अपक्ष उमेदवार निखिल वसंतराव सातपुते यांचे वर्धा विधानसभा प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा दिनांक 4 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 वाजता कृष्णा चौक, कृष्णा नगर वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रचार कार्यालयाचे उद्घाटक म्हणून माजी सहाय्यक पोलीस उपायुक्त गंगाधर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्ह्यातील नामवंत ज्येष्ठ समाजसेवक श्याम पठवा, विषेश अतिथी ज्येष्ठ नागरिक मनोहर देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते पप्पू दांगट यांचे आई वडील, अमोल आतकर यांचे आई वडील, सुशांत जीवतोडे यांचे आई वडील, कृष्णा नांदुरकर यांचे आई वडील, विशाल सराह यांचे आई वडील व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी उमेदवार निखिल सातपुते यांनी निवडणूक लढण्याच्या मुद्द्याचे विश्लेषण करीत मान्यवरांना व श्रोत्यांना संबोधित केले. उद्घाटनाच्या आयोजनाकरिता सुशील शिरे, किशोर बाहे, प्रदीप मेंढे, अशोक भीवगडे, प्रसाद दोडके, मंगेश भोंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले असून कार्यक्रमाची प्रास्तावना यशोधन देशपांडे, संचालन सौ. कल्याणी भोंगाडे तर आभार सौ. स्वाती सातपुते यांनी मानले.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला निखिल सातपुते मित्रपरिवार, जय महाराष्ट्र युवा संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 🙏