अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला आपला देश कृषीप्रधान देश आहे, सालभराच्या कष्टप्रद मशागतीनंतर या देशातला शेतकरी धान्य पिकवतो, देशवासियांना मायेने घास भरवितो, उद्योगपतींना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे मोल ठरविण्याचा अधिकार आहे, नाही तर फक्त भारतीय शेतकऱ्यांना, स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटली पण आजही इथला शेतकरी अन्यायाच्या जात्यात मूकपणे भरडला जात आहे, हमीभासाठी तो ओरडतो, उत्पादनखर्चावर भाव द्या अशी याचना करतो पण त्याच्या आर्तकिंकाळ्या बधीर शासनकर्त्यांच्या कठोर मनांना पाझर फोडत नाही असे चिंतनीय प्रतिपादन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे गेल्या ११ महिन्यांपासून हमीभावाच्या कायद्यासाठी आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांचे सुमारे ५१ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज बुधवारी सकाळी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या आणि अडचणी समजून घेत या सर्व मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करणार असून या सर्व मागण्या मंजूर होईपर्यंत शांत बसणार नाही अशी ग्वाही यावेळी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान पठाण यांनी दिली.आपल्या मनोगतात आमदार साजिद खान पठाण म्हणाले की, शेतीव्यवसायाची ही सर्वस्तरीय लूट थांबली पाहिजे, जगाच्या पोशिंद्याला आपल्या मागण्या तडीस नेण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावे लागते हा भारतीय प्रजातंत्राचा दैवदुर्विलास आहे, एक दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतीव्यवसायाची पडझड राजकर्त्यासाठी निश्चित चिंतनाचा आणि आत्मपरिक्षणाचा विषय आहे, यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, प्रकाश तायडे, महेंद्र गवई, जगदीश मुरूमकर, अक्षय राऊत, निखिलेश दिवेकर, अविनाश देशमुख, गोपाल दातकर, मंगेश काळे, विजय देशमुख उगवेकर, पंकज जायले यांच्यासह शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरीगण मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


