वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
राजमाता माँ जिजाऊ यांची 427 वी जयंती माँ जिजाऊंचा जयघोष करून उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याला दोन छत्रपती प्रदान करणाऱ्या माँ जिजाऊ तसेच शिक्षण प्रेरीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या मुस्लिम महिला सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती या शासन परिपत्रकानुसार दशनवरात्रोत्सवात सामील असल्याकारणाने मराठा महासंघाच्या कार्यक्रमात यांच्या पण अभिवादानाचा कार्यक्रम समाविष्ट केला जातो.

मा.ना.डॉ पंकजभाऊ भोयर यांच्या मागील विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात त्यांनी जिजाऊप्रेमींना जिजाऊचरणी नतमस्तक होण्याकरिता अप्रतिम सुंदर अशा स्मारकाची निर्मिती करून दिली तेथेच शेतकरी कृषक संस्थेच्या सचिव विभा दाते यांनी माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मराठा महासंघ शहराध्यक्षा साधना पवार यांनी माल्यार्पण केले.युवा दिनाचे प्रणेते स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून मराठा महासंघ विदर्भ सचिव दीपक कदम आणि जिल्हाध्यक्ष अरुण जगताप यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर आणि मनीषा निकम यांनी दीपप्रज्वलन करताच उपस्थितांनी माँ जिजाऊंचा जयघोष केला. यावेळी डॉ विजय बाबर ,जिल्हा उपाध्यक्षा कुंदा घाडगे,स्नेहल टाकोणे,नीलिमा फासगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी माँ जिजाऊ यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यात आला.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती देशमुख आणि संकल्प महिला मंच अध्यक्षा प्रतिभा वाळके यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव माधुरी मोहिते, युवती जिल्हाध्यक्षा मोनाली मोहिते, उपाध्यक्षा पूनम शिंदे,सचिव वर्षा शेळके,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप राहाटे,जिल्हा संघटक अमोल वाघ,शहराध्यक्ष विवेक जगताप यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला संजीव शेळके,नितिन देशमुख, नलिनी धानोरकर, मनीषा राजमलवार,नीलिमा जांभूळकर,भावना सोमवंशी, पुष्पा सोमवंशी, सुनीता करडे,बबिता चौधरी,सीमा देवडे,सुजाता पाटील आणि बाळ जिजाऊ किव्या पाटील यांची उपस्थिती होती.

