अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
एका अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करण्यात आला. तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलगी ही 17 वर्षांची आहे ती शिक्षण घेत असून ती वस्तीगृहात राहते. ती मोबाईलवर आपल्या आई सोबत बोलत होती. त्यावेळी आरोपीने तिला मेसेज टाकून आठ दिवसापूर्वी त्याने पीडित मुलीचा पाठलाग करून तिला “आय लव्ह यू” असे म्हणत प्रपोज केले होते.


