गणेश राठोड :-जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
प्रहार चे प्रशासनाला निवेदन
उमरखेड – महागाव तालुक्यातील तसेच जिल्हाभर शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस तोडून कारखान्यात नेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस तोडून कारखान्यात नेण्यासाठी ऊसतोड मुकादम(ठेकेदार) व कारखान्यातील ऊस तोडी संबंधित अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या ऊस न तोडता जाणुन बुजुन ऊस तोडीसाठी विलंब करीत आहे. सदर ऊस मालाच्या गुणवत्तेत फरक पडून उसाचे वजन घटत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हा होत असलेला विलंबथांऊन “आम्ही आमच्या तुमच्या शेतीतल ऊस तात्काळ तोडून कारखान्यात नेऊ पण आम्हाला सदर ऊस तोडीसाठी दहा ते वीस हजार रुपये प्रति एकर जास्तीचा द्यावा लागेल व संबंधित ऊस तोड कारागिरांना जेवण, त्याची राहण्याची सोय, ऊस वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हरची सोय, त्याचे खाणे ,पिणे व त्यांचा ट्रीप मागे ट्रॅक्टर च्या ड्रायव्हरला एक हजार रुपये भत्ता द्यावा लागेल. अन्यथा ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही तुमचा ऊस कारखान्यात नेऊ” असे म्हणत उधट वागणूक व आर्थिक व मानसिक, पिळवणुक ऊस तोडीचे मुकदम (ठेकेदार)तसेच कारखान्यातील ऊस तोडी संबंधित अधिकारी कर्मचारी हे सध्या शेतकऱ्यांची करीत आहेत.
यामुळे शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्या आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असल्यामुळे त्यांच्या शेतीतल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल शेतकरी राजा आज उचलताना दिसत आहे. त्यामुळे या शेतकरी राजाला धीर देऊन शेतकरी राजाची आर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या संबंधित ऊसतोड मुकडदम (ठेकेदार) तसेच कारखान्यातील ऊसतोड संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस हा वेळेवर कारखान्यात न्यावा असे आदेश तात्काळ कारखाना प्रशासनाला व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सय्यद माजिद, शहर प्रमुख राहुल मोहितवार ,तालुका उपप्रमुख गोपाल झाडे ,शहर सचिव श्याम चेके, अंकुश पानपट्टे, अभिजीत गंदेवार ,शैलेश मेंडे,जय किसान पुरी, रघुनाथ खंदारे, गणेश खंदारे,गुणाल भत्ते,भाऊराव देशमाने,जय अंनखुळे, रविंद्र अंनखुळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्याला प्रहार स्टाईलने धडा शिकवू- राहुल मोहितवार
उमरखेड- महागाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील ऊस हा वेळेवर कारखान्यात न नेता त्यांना जास्तीच्या पैशाच्या हवासापोटी ऊसतोड मुकडदम व कारखान्यातील ऊस तोडी संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बांधवांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक न थांबवल्यास संबंधितांना प्रहार स्टाईलने धडा शिकवू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी दिला.


