सिद्धार्थ कदम:-पुसद प्रतिनीधी
भीमा कोरेगाव शौर्य दिनी शूरवीरांना मानवंदना*
*ढोल ताशाच्या गजरात रॅली काढून प्रबोधन व गीत गायनाचे भिम टायगर सेनेचे आयोजन* सिद्धार्थ कदमपुसद प्रतिनिधी: मौका मिलेंगा तो मरेंगे वतन पर, सीना तान के कहेंगे धरती पर,अमित शहा एक बार नही सौ बार नही जब तक है जान तब तक कहेंगे आंबेडकर..आंबेडकर..आंबेडकर… अशा परखड शब्दात भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिला. यावेळी जनतेने सुद्धा साध घालीत दादासाहेब शेळके यांच्या मताला आंबेडकर आंबेडकर आंबेडकर अशा घोषणा देऊन सहमती दर्शविली. भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके हे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित पुसद येथील कार्यक्रमात प्रबोधन पर भाषणात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भीमा कोरेगाव मध्ये 500 महारांनी 28 हजार पेशवे जरी कापले असतील तरी आपले काम संपले नाही असे म्हणत परभणी व अमित शहा आणि इतर प्रकरणावरून पेशवाई फणा वर काढीत आहे त्याला ठेचून काढण्याची गरज असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तीन पुतळा चौकात ययाती भाऊ नाईक व भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष भारत कांबळे व समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून धम्म संस्कार केंद्रप्रमुख संतोष गायकवाड व उपस्थित त्यांचे विद्यार्थी व महिला मंडळ यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य अशी ट्रॅक्टर वर शहीद स्मारकाची उभारणी करून मोठ्या जनसागराच्या स्वरूपातील रॅलीचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते निळी झेंडी दाखवून करण्यात आले. चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग नेताजी सुभाष चंद्र बोस चौक येथून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मुख्य पुतळ्याजवळ रॅलीच्या समारोप झाला. द्वितीय सत्रामध्ये सायंकाळी ठीक 6 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम भीम शाहीर संविधान मनोहरे आणि संच अमरावती यांच्या भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाने पुष्पावंती नगरी मंत्रमुग्ध झाली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक एलसीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे, पोलीस अधिकारी आनंद भगत व भीम टायगर सेनेची संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, नारायण ठोके, सितलकुमार वानखेडे, आदिवासी समाज भूषण मारोती भस्मे सर्व पाहुण्यांचे स्वागत भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी शाल व ट्रॉफी देऊन केले .भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मोहिनी ताई नाईक यांनी विचार मांडले.

नंतर पुन्हा संविधान मनोहरे आणि संच यांच्या भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली त्यांच्या कार्यक्रमाला हजारो महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जनार्दन गजभिये यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, विष्णू सरकटे, अण्णा दोडके, संतोष गायकवाड, विनोद जाधव ऑटो ॲम्बुलन्स, दत्ता कांबळे, राजकुमार पठाडे ,राजू पठाडे, संजय शेळके, रवी शिंगणकर, संदीप काखडस,देवेंद्र खडसे व सर्व शाखेचे अध्यक्ष व सदस्य यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.


