पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी हेमंत शेडगे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लातूर येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
पोलीस निरीक्षक शेडगे यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 24 डिसेंबर रोजी काढला. त्यानंतर पोलीस निरीक्षक शेडगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. दरम्यान शेडगे यांची नियुक्ती होई पर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचा पदभार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे देण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक माने यांच्या आठवड्याच्या कार्यकाळात त्यांनी यल्लमवाडी ता मोहोळ येथील कृष्णा चामे यांच्या खुनाचा झडा लावून संशयताला गजाआड केले.पोलीस निरीक्षक शेडगे यांनी यापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणमध्ये शिक्रापूर, यवत, गोंदिया, सातारा या ठिकाणी सेवा बजावली आहे
पोलीस दला तर्फे निवड झाल्यानंतर साउथ सुदान देशात जाऊन त्या ठिकाणीही एक वर्षभर सेवा बजावली आहे. त्यांनी सीबीआय विभागातही काम केले आहे. दरम्यान आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असून समाजातील शांतता बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस निरीक्षक शेडगे यांनी दिला.


