वर्धा विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडदरा, तळेगाव (शा.पं.) च्या भव्य प्रांगणात १८ डिसेंबरला बीटस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला होता. यावेळी समर गीत आणि पोवाडा या नृत्य प्रकारात उत्कृष्ठ सादरीकरण देऊन महात्मा गांधी जि. प. प्राथमिक शाळा आष्टीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून बालक्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी सदर स्पर्धेमध्ये एकूण आष्टी, तळेगाव व चिस्तुर केंद्रातील तालुका स्तरीय विजयी शाळा व त्यांच्या चमू सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यांशी स्पर्धा करून महात्मा गांधी जि. प. शाळा आष्टीतील विद्यार्थ्यांनी समरगीत आणि पोवाडा या नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीचे एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते.सदर स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा सोनटक्के आणि सहाय्यक शिक्षिका कु. चोपकर , कु. वटके आणि कु. उगोकार यांनी मार्गदर्शन केले. सदर यशाबद्दल विद्यार्थ्यांचे , त्यांच्या पालकांचे आणि शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.


