अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील अकोला टी पॉईंट जवळ मंगळवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास अभिमन्यु वानखडे वय अंदाजे ३५ रा पिंपळखुटा हे दुचाकी क्र एम. एच. १४ ई डी ४८७५ ने अकोला कडुन वाडेगाव कडे येत असतांना समोरून येत असलेल्या क्रेनला दुचाकीची | धडक बसली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहीती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला त्वरीत १०८ ने उपचाराकरीता अकोला येथे रवाना केले. व घटनेचा पंचनामा करून पुढील अधिक तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत.


