भंडारा विभाग प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारे
३०डिसेंबर पर्यंत घरकुल लाभार्थी चें देयके अदा करा
मोहाडी: मोहाडी नगर पंचायत येथे घरकुल चा मुद्दा तापलेला असुन २ वर्षापूर्वी मोहाडी येथील गरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल वाटप करण्यात आले. गोर गरीब लोकांनी कित्येक वर्षांचा प्रतिक्षे नंतर घरकुल मिळाल्याने उसनवारी , दागिणे गहाण ठेवून घरकुल तयार केले.

घरकुल लाभार्थ्यांना पहिला हफ्ता देण्यात आला नंतरचे पैसै दोन वर्षापासून देण्यात आले नाही उसनवारी केल्याने कर्जाचा बोजा लाभार्थी वर असुन ज्यांच्याकडून साहित्य घेतले त्यांनी पैसे करीता तकादा लावलेला आहे.आधीच उपासमारीची पाळी असतानी कर्ज कसा फेडणार अशी मोठी समस्या लाभार्थी वर येऊन ठेपलेली आहे.घरकुल चे काम पूर्ण झालेले असताना सुध्दा अजून पर्यंत देयके का अदा करण्यात आली नाही असा सवाल संतप्त लाभार्थी व्यक्त करीत आहेत. नगर विकास संघर्ष समिती तर्फे वारंवार निवेदने देऊन सुध्दा नगर पंचायत ने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आज दि.२४/१२/२०२४ ला नगर विकास संघर्ष समिती ने मुख्याधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पूर्ण परिस्थिती अवगत करून घरकुल लाभार्थी यांच्या खात्यावर दि.३० डिसेंबर २०२४ पर्यंत उर्वरित रक्कम अदा करण्यात यावी अन्यथा दि.३१ डिसेंबर २०२४ ला सकाळी ११ वाजता नगर पंचायत ला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले

यात संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील निवेदन देतेवेळी,नगर विकास संघर्ष समिती चे रफिक (बबलु) सैयद,पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर,नगरसेवक सेवक चिंधालोरे, अफरोज पठाण,श्याम चौधरी, हंसराज नीमजे, नितीन निंबारते, प्रकाश मारबते, शरद हेडाऊ, प्रकाश न्यायखोर काशिनाथ रंभाड व लाभार्थी उपस्थित होते . या कडे संपूर्ण मोहाडी नगरवसियांचे विशेष लक्ष लागलेले आहे. घरकुल मुद्दा तापणार हे विशेष.



