वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
शंकर डोंगरे राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
नागपूर/वर्धा :-संत गाडगेबाबा जन जागृती कला मंच वर्धा जिल्हा चे वतीने श्री.गुरुदेव सेवाश्रम सुभाष रोड, आग्याराम देवी मंदिर चौक रमण सायन्स जवळ ,शुक्रवारी तलाव नागपूर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार श्री. शंकर बापूराव डोंगरे यांना मदत सामाजिक संघटना नागपूर तर्फे राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वर्धा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा संत गाडगेबाबा जनजागृती कला मंच वर्धा जिल्ह्याचे सचिव पद्माकर कांबळे यांच्या वतीने भव्य मोठा गुच्छ देऊन नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मदत संघटनेचे सचिव माननीय.दिनेश भाऊ वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश भाऊ पांडव यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, संविधान , शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील तथा संभाजीनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हैसिनी उचित मॅडम,संजय गोडघटे नागपूर, डॉ.मंदाकिनी भानसे, जवादे,कामगार नेते नजीर भाई शेख,अमरावती येथील समाज सेवक पुंडलिक गोसावी,अर्चना गोसावी,समाज सेविका विद्या पाटील मॅडम, समाजसेवक सुशील नगराळे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.उषाताई कांबळे, आशा खोडे, प्रल्हाद गोटे, अमोल कांबळे,मंगेश थूल,गायक किशोर वागदे मित्र मंडळी नी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पद्माकर कांबळे यांनी शंकर डोंगरे त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले .पद्माकर कांबळे पुढे म्हणाले की, शंकर डोंगरे हे मूळचे गौळ येथील रहिवासी असून ते नागपूर येथे बऱ्याच वर्षापासून नागपुरात वास्तव्य करीत आहे ते एक गरीब कुटुंबातील व्यक्ती असून जनसामान्यांसाठी नेहमी अग्रेसर असतात.ते गेल्या अनेक संघटनेमध्ये गीत गाण्याच्या माध्यमातून कार्य केले त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पद्माकर कांबळे यांनी पुढील जीवनातील वाटचालीकरिता येणाऱ्या 2025 मधील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्ष सुख समाधानाचे जावे अशी शुभेच्छा देण्यात आल्या.


