बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
सुलतानपूर दि 23. आज रोजी नागवंशी संघटन, अख्तरभाई मित्र मंडळ, मुस्लिम एकता कमिटी, आझाद ग्रुप तथा गावकऱ्याचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागवंशी संघपाल पनाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले, त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मावळे समजून सर्व जाती-धर्माच्या सण उत्सवामध्ये सामील होऊन सन उत्सव साजरे करावे,व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यावे असे विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थित नागवंशी संघपाल पनाड, माजी सरपंच सलीम शेठ, शेख अख्तर भाई, पत्रकार जमीर साहेब, अमीर भाई, संतोष शिंदे, सद्दाम भाई,रमेश भानापुरे,गफ्फार शहा, शेख जावेद शेख लाल,भाई,लालू भाई मुल्लाजी, भानदास पवार, सुभाष खेत्रे, नागशेन पनाड, पत्रकार सुरेश मोरे,वसिम भाई,रोशन भाई,गणीभाई ठेकेदार, मुख्तार भाई मुल्लजी,सय्यद भाई,नशिर भाई भंगावाले,युनूस पठाण,महेश मोरे, मनोहर पनाड ,मंगेश पनाड ,संदेश पनाड, संजय शेजुळ ,अशोक महाराज पनाड, प्रसेंजीत पनाड तथा सर्व गावकरी उपस्थित होते.



