माहिती संकलन विभाग:-
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्य शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर यांनी दिली श्री. बाळासाहेब कोळेकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रीच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रीच्या समाधी दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी श्रीचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे त्यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही तसेच नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार दिनांक २५ डिसेंबर ते बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी असे ०७ दिवस वाहन पूजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीचे कालावधीत श्री साई सत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरू राहतील याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी असे सांगून मंदिर व परिसरात फटके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही श्री. बाळासाहेब कोळेकर यांनी केले हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संस्थांचे प्र.मुख कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांचे प्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहे 🙏🌹🌹 ओम साई राम 🌹🌹🙏


