भंडारा विभाग प्रमुख:- प्रीतम कुंभारे
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लक्षवेधी धरणे *नागपूर विधिमंडळावर विज्युक्टा व महासंघाने दिले धरणे* *2) मान्य मागण्यांचे अंमलबजावणीसाठी शिक्षक आक्रमक* *शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय मागण्या संबंधात गेली वर्षभरात लोकशाही मार्गाने विज्युक्टा व महासंघाने विविध आंदोलने केली. फेब्रुवारी 2024 च्या परीक्षा कालावधीत आंदोलनादरम्यान शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या बैंठकामध्ये अनेक विषय मान्य करण्यात आले, मात्र मान्य मागण्यांचे आदेश अजूनही प्रलंबित असल्याने आज गुरुवार दि. 19- 12- 2024 ला नागपूर विधिमंडळावर करण्यात आलेल्या लक्षवेधी धरणे कार्यक्रमात पुढील मार्गदर्शक काढणे शिक्षक समुदायाला मार्गदर्शन केले.**1. डॉ. संजय शिंदे ( महासंघाचे अध्यक्ष ) सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी प्रखर लढा देण्याची भूमिका घ्यावी प्रत्येक एका मागणीवर वेगळी संघटना निर्माण करू नये असे मत मांडले.**2. प्रा. मुकुंद आंधळकर ( समन्वयक ) शांततामय मार्गाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी संघटना सतत प्रयत्नशील राहिल पण आपण सर्वांनी संघटनेला पाठबळ द्यावे असे मत व्यक्त केले.**3. डॉ. अविनाश बोर्डे ( विज्युक्टाचे अध्यक्ष ) संघटनेच्या बळावर शिक्षकांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या ज्या शिल्लक आहेत त्यासाठी सतत संघर्ष सुरू राहील असे सांगितले.**4. डॉ. अशोक गव्हाणकर (महासचिव): शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव कायम ठेवावा त्यासाठी आपली एकजूट व संघर्ष महत्वाचा आहे असे विचार व्यक्त केले.**5. आमदार सुधाकर अडबाले : शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी सभागृहात सतत प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले आणि अनेक मागण्यां निकाली काढल्या परंतु प्रश्न निकाली निघण्यासाठी शिक्षकांना संयम बाळगावा लागेल असे मत मांडले.**6. आमदार संजय देरकर: शिक्षण क्षेत्रात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.**7. आमदार मसराम सर: वडील शिक्षक होते शिक्षकांच्या प्रश्नाची मला जाणीव आहे त्यासाठी मी सतत सभागृहात लढा देईल असे मत व्यक्त केले.**8. प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे ( महासंघ उपाध्यक्ष ): संघटने शिवाय प्रश्न मार्गी लागत नाही.

परंतु प्रत्येक शिक्षकाने तन मन धनाने संघटनेच्या प्रती निष्ठा दाखविण्याची आज काळाची गरज आहे.अन्यथा येणारा काळ फार अंधकार मय आहे असे परखड विचार व्यक्त केले.* *[ प्रमुख मागण्या ]* *१), जुनी पेन्शन योजना लागू करा.**२) अनुदान सूत्र प्रचलित पद्धतीने लागू करा.**३) 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करा.* *४)विद्यार्थी हितास्तव शिक्षक भरती करा.**५) आयटी IT ला अनुदान व वाढीव पदाचे समायोजन करा.* *६) तुकडी टिकवण्याचे निकष शिथिल करा.*———————————👉 *लक्षवेधी मागण्या*👉 *१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः/ विना /टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षकांवर जुनी पेन्शनबाबतचा झालेला अन्याय दूर करावा.*👉 *२) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.*👉 *३) राज्यातील अंशत: अनुदानित शाळा क.म.वि शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी व त्यांना जीपीएफ/एनपीएस अंशदानाची अनुमती द्यावी.*👉 *४) १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी.*👉 *५) ” विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक द्या ” राज्यात शिक्षकांची सर्व रिक्त पदे विना विलंब भरावीत.*👉 *६) विनाअनुदानित कडून अनुदानितकडे बदली केलेल्यांचे प्रस्तावाचे पुर्वीप्रमाणे उपसंचालकांना अधिकार देण्यात यावेत.*👉 *७) वाढीव पदावरील शिक्षकांचे समायोजन तसेच आयटी IT शिक्षकांना अनुदान देण्यात यावे.*👉 *८) शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात २१ विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये ३१ विद्यार्थी ही पटसंख्या ग्राह्य धरावी.* *९).एम.फिल.,एम.एड.,पीएच.डी. धारकांना वेतन वाढ लागू करावी व केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० करावे.*👉 *१०) उपदान वाढीचा लाभ १ सप्टेबर २०२४ ऐवजी ७ व्या वेतन आयोगाच्या लाभ दिनांकापासुन देण्यात यावा.पेन्शन विक्री वसुली १५ ऐवजी १२ वर्ष करावी.*👉 *११) DCPS/NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी. वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत.*👉 *१२) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला, शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे.* 👉 *१३) घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे मानधन द्यावे,त्यांची प्रलंबित देयके त्वरीत अदा करावी.*👉 *१४)अर्धवेळ शिक्षकांची सेवा इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी,*👉 *१५) १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या नपा, मनपा शिक्षकांना डीसीपीएस/ एनपीएस योजना त्वरित लागू करावी.*👉 *१६) २० सप्टेंबर २०२४ च्या शासन आदेशातील नॉन क्रिमिअल इयर ही अट असल्याने उत्पन्नाचा दाखला मागू नये.*
*विधि मंडळावरील या* *लक्षवेधी धरणे आंदोलनात**महासंघाचे अध्यक्ष डाॅ. संजय शिंदे,*समन्वयक प्रा.मुकुंद आंधळकर विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, प्राध्यापाक सुनील पूर्णपात्रे महासंघ उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात लक्षवेधी धरणे करण्यात आली.**या धरण्यांमध्ये आमदार सुधाकर अडबाले, आमदार संजय देरकर, आमदार मसराम सर, प्राध्यापाक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे महासंघ उपाध्यक्ष , प्रा राजेंद्र शिंदे , प्रा. हेमंत शिंदे, प्रा. रविंद्र भदाने , प्रा. भानुदास बिरादार मुंबई , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. वितेश खांडेकर, विज्युक्टा के.का. सहसचिव डॉ. अभिजीत पोटले, नागपूर शहर अध्यक्ष डॉ. चेतन हिंगणेकर, ग्रामीण अध्यक्ष डॉ. नितीन देवतळे,* *प्रा. विवेक देशमुख, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, सचिव प्रा. अशोक गायधनी, प्रा. सैंग कोहोपरे, प्रा. लेनगरे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रा. पवन कटरे, सचिव प्रा. अरविंद शरणागत, के. का सदस्य प्रा. जोगेश्वर भेंढारकर, वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रा. अभिजीत डाखोरे, चंद्रपूर* *सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, के. का. सदस्य प्रा. प्रमोद भोयर, माजी अध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, गडचिरोली जिल्हा सचिव, नंदकिशोर मॅनेवार, विज्युक्टा उपाध्यक्ष, प्रा. रोमेंद्र बोरकर सर, गोपाले सर, सहसचिव प्रा. धर्मेंद्र मुनघाटे सर, नागपूर कार्याध्यक्ष डॉ. शालिनी तेलरांधे,* *सचिव डॉ. गजानन धांडे, कोषाध्यक्ष प्रा. विशाल बोरकर, प्रा.चेतन मोझरकर,**प्रा. अपर्णा पाठक, महासंघ प्रतिनिधी प्रा. भाऊ गोरे, माझी कोषाध्यक्ष, प्रा. सूर्यकांत भोंगळे, मार्गदर्शक प्रा. गोडसे सर, माजी अध्यक्ष नागपूर शहर डॉ. राजाभाऊ दुरुगकर, माजी सचिव नागपूर डॉ. जयंत जांभुळकर, माजी के. का सदस्य डॉ. भुजाडे सर,**उपाध्यक्ष: डॉ. गोविंदा चौधरी, संघटन सचिव: प्रा. भरत काळे, प्रसिद्धी प्रमुख: डॉ. सुधीर रायपूरकर, सहसचिव: प्रा. प्रशांत डेकाटे, प्रा. जयंत डहाके, कार्यकारिणी सदस्य:* प्रा. सचिन दुरुगकर, प्रा. सुनील राठोड, डॉ. सुजीत चव्हाण, प्रा. आमीर आफाक, प्रा. जावेद अंसारी, प्रा. गुरुफान खान, प्रा. ओमप्रकाश भेंडे, प्रा. ललित मुटे, प्रा. नितीन कराळे, प्रा. अमित चौधरी, प्रा. अभिषेक जीरापुरे, प्रा. सूचिता बदखल प्रा. प्रशांत चौधरी, प्रा. प्रबल सरकार, प्रा. भुरे, प्रा. तुमसरे, यांचे सह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.इ


