वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
वर्धा शहराला स्वच्छ व दररोज पाणी पुरवठा होण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, वर्धा शहराला होणारा पिण्याचा पाणी पुरवठा हा अत्यंत दूषित आणि आरोग्यासाठी घातक आहे. वर्धा शहराला मिळणारे पाणी नदीवरून 2 जागेहून लिफ्ट केले जाते. सदर पाणी हे सरळ फिल्ट्रेशन प्लांट ला सोडण्यात येते. नदीकाठ लगतच्या गावाचे सांडपाणी, गुरढोरांच्या विष्ठा तसेच शेतातून आलेल्या अनेक रासायनिक खताचे ढिगारे आणि त्यातून निघणारे पाणी हे सर्व नदीच्या पाण्यात सोडण्यात येते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शिवाय कॅन्सर चे प्रमाण पण वाढले आहे.तसेच आपण वर्धेकर संपूर्ण वर्षाचा प्रत्येक दिवसाचा पाण्याचा कर भरतो पण आपल्यालाआठवड्यातून फक्त २-३ दिवसच पाणीपुरवठा होतो.

ह्या निवेदनाद्वारे वर्धेकरांच्या आरोग्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी हा मूलभूत अधिकार तर आहेच तसेच सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे करिता स्वच्छ पाणी सर्वांना मिळावे त्यासाठी योग्य ती उपाययोजना त्वरित करावी अशी विनंती जिल्हाधिकारी ह्यांना ह्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी श्री. अर्चित निघडे , श्री.प्रसाद पोटदुखे , श्री.सचिन मेघे , श्री.सचिन राऊत , श्री. सचिन गरपाळ , डॉ .अमित पुजारी व डॉ. अंजली पुजारी, डॉ. शंतनू चव्हाण आदी यांची उपस्थिती होती.विधानसभा निवडणुकीच्या वेळी डॉ. सचिन पावडे यांनी प्रचारच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना हात घातला, तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाची या गंभीर प्रश्नांवरील उदासीनता जनतेसमोर ठेवण्यात आली होती. जलयोद्धा म्हणून सुपरिचित असलेले डॉ. सचिन पावडे समाजकारण असेच सुरू ठेऊन यापुढेही सामाजिक कार्य व प्रश्नांना घेऊन समोर जातीलच याची प्रचिती यांत दिसून आली.

