गणेश राठोड जिल्हा प्रतिनिधी:- यवतमाळ
उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावात मागील कित्येक महिन्यापासून माकडाने बस्थान मांडले आहे. दिवसभर माकड गावात उड्या मारत फिरत असल्याने लहान -मोठया मध्ये भीती पसरली आहे.ढाणकी गावात बस्थान मांडून बसलेले हे माकड गावात एका घराच्या छपरावरून दुसऱ्या घरावर उडी मारणे, रस्त्याने जाणारे नागरिक व लहान मुले यांच्यावर चेतावळून जाणे,वस्तू पळविणे, रस्त्यावरून जाताना अंगावर धावून येणे . यामुळे लहान मुलांसोबतच नागरिकांमध्ये भीती पसरली असून, वनविभागाने वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.चौकट ढाणकी गावात माकडाची टोळी असून त्यांनी कन्याशाळा ते तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या परिसरात आपला बस्थान मांडला आहे. या परिसरात लोकांची गर्दी जास्त राहते, वन विभाग यांनी याची दक्षता घेऊन या माकडाच्या टोळीने कोणाचा घात करण्या अगोदर रेस्क्यू करून या माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.


