भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
मोहाडी:- जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथे शाळेचे माजी विद्यार्थी श्री संजय श्रीकिसन पशीने यांनी सदिच्छा भेट दिली… ते मूळचे मोहाडी येथीलच रहिवासी असून येथील पूर्वीचे मालगुजार स्वर्गीय ब्रिजलालजी पशिने पाटील यांचे ते नातू आहेत …ते सध्या लंडन येथे अतिउच्च पदावर कार्यरत आहेत.. काही कामानिमित्त गावी आले असता, त्यांनी शाळेला स्वतःहून भेट दिली आणि शाळेला “एक लक्ष रुपये”(१,००,०००) वर्गणी दिली.. त्यातून दहावी /बारावी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानण्यात आले.. सोबतच त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले…
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा लाडे , जिल्हापरिषद सदस्य देवाभाऊ इलमे, प्रफुल देशमुख , चिंतामण हटवार, नामदेव साठवणे, सेलोकर सर, बारांपात्रे सर , शिंगाडे सर, सूर्यवंशी सर, राजेंद्र राऊत , तसेच इतर कर्मचारी वृंद आणि संपूर्ण विदयार्थी उपस्थित होते.



