भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे..
*🙏 श्री दत्तगुरुंचे २४ गुण – गुरु 🙏*|| श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि || अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले || आणि त्यांपासून काय बोध घेतला’, हे यात अवधूत || सांगतो. { येथे ‘गुरु’ हा शब्द वापरला असला, तरी तो || ‘शिक्षक’ या अर्थाने वापरला आहे } अवधूत म्हणतो, || जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक || गोष्टीपासून काहीना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून || कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून || कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळते. || वानगीदाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरूंपासून || थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला || आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले. १ } पृथ्वी 🔸:———— || पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.२ } वायू 🔹:———— || सुमन गंध वेचणें | दशदिशास वाटणें | || अनिल-नीती मधुरतरा | मानवे न तुज कशी || -:♦ भावार्थ 🔸:———— || वारा सुगंधी फुलावरून वहातांना सुगंधाने आसक्त || होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या || वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत ३ } आकाश 🔹:———— || आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून || राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व || राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त || आणि अचल आहे.४ } पाणी 🔸:———— || मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे. || कोणाचाही पक्षपात करू नये. || { पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. || त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी }५ } अग्नि 🔹:———— || मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि || जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण || न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी || वापरावे.
६ } चंद्र 🔸:———— || अमावास्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा || कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात. || ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून || त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास || देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. || { आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, || तर वाढतो किंवा मरतो, तो आपला देह }७ } सूर्य 🔹:———— || सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो. || आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव || करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय || करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून || निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा || पण त्याचा अभिमान बाळगू नये.८ } कपोत 🔸:———— || जसा बहिरीससाणा कपोताला { कबुतराला } || परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य || स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय || मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव || मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.९ } अजगर 🔹:———— || जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर || विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो आणि || ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष || पावतो, त्यात अल्प-अधिक किंवा कडू-गोड असा || विचार करत नाही, काही काळ खावयास मुळीच || मिळाले नाही, तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती || असतांनाही तिचा उपयोग करावयास जात नाही, तद्वत् || मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही || मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, || तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.१० } समुद्र 🔸:———— || जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित || जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास || दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू || { कृश } होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने || स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी || होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ || नये, सदैव आनंदभरित असावे.११ } पतंग 🔹:———— || पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग || मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. || त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरता, स्त्रीची || लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, || तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.१२ } मधमाशी आणि मधुहा 🔸:———— अ } मधमाशी 🔹:———— || मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी, || उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. तो ती || स्वतःही खात नाही आणि दुसर्या कोणास खाऊ देत || नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन, || तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. || त्याप्रमाणे जो कृपण महत्प्रयत्न करून द्रव्यार्जन || करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर || किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे || शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनीतीमान संतती || प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो || निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालवश झाल्यावर || ते द्रव्य जेथल्या तेथे रहाते अगर भलत्याला प्राप्त होते. || मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो || पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणार्याला || उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक || मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन || द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.आ } मधुहा 🔸:———— || ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची || प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल, || भांडीकुंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव || करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रम्याच्या घरचे || सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वरप्राप्तीच्या || उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू || गृहस्थाश्रमीजनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात.१३ } गजेंद्र { हत्ती } 🔹:———— || हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी || माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात. || त्यावर काष्ठाची एक हत्तीण करून तिला गजचर्म || पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात. तिला || पाहून हत्ती विषयसुखलालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने || त्या काष्ठाच्या हत्तिणीसन्निध येतो आणि त्या खड्ड्यात || पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो. || त्याप्रमाणे जो पुरुष स्त्रीसुखास भुलतो, तो त्वरित || बंधनात येऊन पडतो.१४ } भ्रमर 🔸:———— || सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा || वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या || पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन || प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.१५ } मृग 🔹:———— || पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती || लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध || होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून || कोणत्याही मोहात अडकू नये.१६ } मत्स्य 🔸:———— || लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर || ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात || आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. || त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने || जन्म-मरणरूपी भोवर्यात गोते खात रहातो.१७ } पिंगला वेश्या 🔹:———— || एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला || वेश्येकडे आला नाही. वाट बघून आणि आशेने एकसारखे || आत-बाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक || वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल || असते, तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. ज्या || पुरुषाने आशेचा त्याग केला, त्याला या संसारात एकही || दुःख बाधत नाही.१८ } टिटवी 🔸:———— || एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे, || हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले || आणि तिला टोचा मारून, हतबल करून तो मासा || हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे || जाई, तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी. || शेवटी ‘दे माय धरणी ठाय’ होऊन तिने एकदाचा तो || मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. || हे बघण्याचाच उशीर, टिटवीला सोडून सारे कावळे || आणि घारी त्या मासा उचलणार्या घारीचा पिच्छा पुरवू || लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या || फांदीवर जाऊन शांतपणे बसली. || या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, || नाहीतर घोर विपत्ती.१९ } बालक 🔹:———— || मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन || समजून, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे रहावे || आणि आनंद भोगावा.२० } कंकण 🔸:———— || दोन कंकणे { बांगड्या } एकावर एक आपटून त्यांचा || आवाज होतो. अनेक कंकणे असली, तर जास्त आवाज || होतो. त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप || होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास || करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती || शांत होत नाही. याकरता ध्यानयोगादी करणार्याने || निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे रहावे.२१ } शरकर्ता : { शरकार, शरकट, कारागीर } 🔹:——— || एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते || सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी || वाजतगाजत थाटात गेली. मागाहून एक मनुष्य आला || आणि त्याने त्याला विचारले, ‘‘या वाटेने राजाची स्वारी || गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय ?’’ त्यावर || कारागीर उत्तरला, ‘‘मी आपल्या कामात गर्क || असल्यामुळे मला ते कळले नाही.’’ या कारागिराप्रमाणे || मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान || धरावे.२२ } सर्प 🔸:———— || दोन सर्प कधीही एकत्र रहात नाहीत किंवा समागमे || फिरत नाहीत. ते आवाज न करता सावधपणे फिरतात, || आपल्याकरता रहाण्यास घर न करता वाटेल त्याच्या || घरात जाऊन रहातात. ते उघड रितीने फिरत नाहीत, || प्रमाद { दोष } नसता निंदाही करत नाहीत आणि || अपकार केल्यावाचून कोणावर कोप करत नाहीत. || त्याप्रमाणे दोन बुद्धीमंतांनी कधी एकत्र फिरू नये, || परिमित भाषण करावे, कोणाशी भांडण-तंटा करू नये, || विचाराने वागावे, सभा करून भाषण करू नये आणि || स्वतःच्या रहाण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहून || आयुष्य घालवावे. रहाण्यासाठी घर बांधल्यास अभिमान || उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो.२३ } कोळी : { कांतीण } 🔹:———— || कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो. || आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल, || तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो. || तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून || त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल, || तेव्हा त्याचा इच्छामात्रेच नाश करून आपण एकटा || रहातो. जसा कोळी पुनःपुन्हा तंतू काढून घर करू || शकतो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छामात्रे चराचर जग उत्पन्न || करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास || येईल, तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो. असे असल्याने || जगातील घटनांना महत्त्व देऊ नये.२४ } पेशकार : { भ्रमरकीट, कुंभारीणमाशी } 🔸:———- || सति सक्तो नरो याति सद्भावं ह्येकनिष्ठया | || कीटको भ्रमरं ध्यायन् भ्रमरत्वाय कल्पते || || विवेकचूडामणि, श्लोक ३५८-:♦ अर्थ 🔹:———— || भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला || पावतो तद्वत् एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन || करणारा योगी परमात्मरूपास पावतो.-:♦ विश्लेषण 🔸:———— || जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो, तो त्या ध्यानामुळे || परिणामी तदाकार होऊन जातो. कुंभारीणमाशी मातीचे || घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास || वरचेवर येऊन फुंकर मारत रहाते. त्यामुळे त्या किड्याला || माशीचे ध्यान लागून रहाते आणि तो शेवटी कुंभारीणमाशी || बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरूपदिष्ट मार्गाने ईश्वराचेh ध्यान || धरावे, म्हणजे तो ईश्वरस्वरूप होतो.