सातारा विभाग:- निलेश कोकणे(माण तालुका प्रतिनीधी)
प्रतिनिधी: – शेतकऱ्यांना दिवसा सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देत सिंचनाच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून ११ डिसेंबरपर्यंत एकूण १ लाख १ हजार ४६२ सौर कृषी पंप बसवले आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरून सौर कृषी पंपासह संपूर्ण संच मिळत आहे. दहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे पुढील २५ वर्षांसाठी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्राने सौर कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. पुढील काळात महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास आहे..


